मराठी घरातील सण, सुट्टी, किंवा फक्त काहीतरी गोड खायची इच्छा झाली की पहिलं नाव येतं ते पुरण पोळीचं! तुम्हाला Puran Poli Recipe येते की नाही मला माहीत नाही, पण हा ब्लॉग तुम्ही वाचाल तर नक्कीच तुम्ही बनवू शकाल. ही केवळ एक पोळी नाही, तर एक भावनांचा ठेवा आहे. आज मी तुमच्यासोबत Puran Poli Recipe च्या या गोड यात्रेत सामील होत आहे—काही मजेदार आठवणी, काही टिप्स आणि अर्थातच, तिच्या प्रेमात पडण्याची कहाणी!
पुरण पोळी म्हणजे नुसती डिश नाही, तर एक परंपरा!
लहानपणी माझ्या आजीच्या हातच्या पुरण पोळ्या खायला मिळाल्या, तेव्हा कळलं की “ही केवळ खाण्याची गोष्ट नाही, तर एक अनुभव आहे!” आजीच्या हाताने वेचलेल्या हरबऱ्याच्या डाळीचे पीठ, मैदा किंवा गव्हाच्या पिठाची मऊ पोळी आणि पोळीत गोड गोड पुरण… अरे वाह! त्यातून वरच्यावर लावलेलं तूप… म्हणजे स्वर्गाचा एक छोटासा तुकडा!
पण आता मोठा झालो, आजी दूर गेली, पण तिची पाककृती आणि त्या पोळ्यांच्या आठवणी मात्र मनात कोरलेल्या आहेत. आता स्वतः बनवताना कधी पुरण बाहेर पडतं, कधी पोळी फाटते… पण प्रयत्न चालूच आहे!
पुरण पोळीची कहाणी: काय आहे हे गोड चमत्कार?
पुरण पोळी ही महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात आणि गोव्यातील एक लोकप्रिय पारंपारिक डिश आहे. त्यात दोन भाग असतात:
- बाहेरचा भाग: मऊ, पातळ पोळी (मैदा पीठ किंवा गव्हाच्या पिठापासून बनवलेली).
- आतलं भाग: गोड, चवदार पुरण ( हरभरा डाळ + गूळ/साखर + मसाले).
हे दोन्ही एकत्र येऊन एक अद्भुत स्वाद तयार करतात.
घरगुती पुरण पोळी बनवण्याची सोपी पद्धत ǀ Puran Poli Recipe
साहित्य (४ पोळ्यांसाठी):
- पोळीसाठी:
- १ वाटी गव्हाचं पीठपुरेसे पाणीमीठ (चवीनुसार)
- थोडं तूप
- पुरणासाठी:
- १ वाटी हरभरा डाळ
- १ वाटी गूळ (किंवा साखर)
- १/२ चमचा इलाईची पूड
- १/४ चमचा वेलदोडा पूड
- १/४ चमचा सुंट पूड
टीप : १/२ चमचा केशर सुद्धा वापरू शकता.
कृती:
१. पुरण तयार करणे:
- एका पातेल्यात हरभरा डाळ मऊ शिजवून घ्या.
- शिजलेल्या डाळीत गुळ टाका.
- आता शिजवलेली हरभरा डाळ आणि गुळ मंद एकजीव करून घ्या , त्यात तुम्ही बडीशेफपूड, सुंट पूड आणि इलाईची पूड योग्य प्रकारे मिक्स करा.
- मिश्रण केलेली डाळ पुरण यंत्राच्या सहाय्याने बारीक करून घ्या, बारीक करताना पूर्ण डाळ राहणार नाही याची काळजी घ्या. डाळ राहिल्यामुळे पुरण पोळी करताना पोळी फुटू शकते त्यामुळे पुरण योग्य प्रकारे बारीक करून घ्या.
- आता तुमचे पुरण तयार आहे.
२. पोळीचं पीठ तयार करणे:
- गव्हाच्या पिठात मीठ आणि पाणी घालून मऊ पीठ मळून घ्या.
- थोडा वेळ झाकून ठेवा.
- थोड्या वेळाने पुन्हा तेल घालून पीठ चांगले मऊ मळून घ्या.
३. पुरण पोळी भरणे आणि भाजणे :
- आता मळून घेतलेल्या पिठाचा एक लहान गोळा घ्या, पातळ वळून घ्या, आणि त्याची वाटी बनवा.
- आता पिठाच्या वाटीमध्ये पुरण भरा, आणि चपाती सारखी पातळ वळून घ्या.
- जर पोळी वळून घेताना चिकटत असेल तर, थोडं गव्हाचे पिठ लावा. त्यामुळे पोळी वळताना तुटणार नाही.
- आता पोळीला थोडं तूप लावून तव्यावर भाजा
टिप: पोळी कमी गॅस वर भाजा म्हणजे ती चांगल्या प्रकारे भाजली जाईल.

काय वेगळं करतं पुरण पोळीला खास?
- आजी–आजोबांच्या आठवणी: ही पोळी केवळ जेवण नाही, तर एक भावनिक जेवण आहे.
- सुट्ट्यांचा खास टच: दिवाळी, होळी किंवा रविवारच्या जेवणात ही पोळी असली, की मजा वेगळी!
- तुपाचा राजा: वरून लावलेलं तूप म्हणजे पोळीचा क्राउनिंग ग्लोरी!
मजेदार प्रसंग: माझी पहिली पुरण पोळी!
पहिल्यांदा पुरण पोळी बनवताना मी “पुरणाचा विस्फोट“ करून टाकला! पोळी वळताना फाटली आणि पुरण सगळीकडे पसरलं. मग काय, “छान, ही पुरणाची पोळी नाही, तर पोळीचं पुरण झालं!”
पण हळूहळू सराव केला आणि आता “पोळीचा राजा “ म्हणून प्रसिद्धी पटकावलीय! (छे, खरं तर अजूनही कधीकधी फाटते… पण काय झालं? स्वाद तर परिपूर्ण आहे!)
शेवटचा गोड स्पर्श…
पुरण पोळी ही प्रेम, आठवणी आणि मेहनतीचं प्रतीक आहे. तुम्हीही तयार करा, चाहूल घ्या आणि आपल्या लाडक्यांसोबत हा गोड अनुभव वाटा. आणि जर पोळी फाटली तर घाबरू नका… “फाटलेली पोळी खायला मात्र मस्तच!”
गोड गोड राहा, पुरणपोळी सारखं!
तुम्हाला वरील पुरण पोळीची रेसीपी आवडली असेल तर नक्कीच कमेन्ट करा.
तुमचा प्रतिसाद आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे.
धन्यवाद…..
नेहमी विचारले जाणारे प्रश्न
पुरणपोळीचा उगम कुठून झाला?
पुरणपोळीचा उगम महाराष्ट्रात झाला. हे पारंपारिक मराठी पक्वान्न आहे.
पुरणपोळी कशी खातात?
पुरणपोळी सामान्यतः तूप, लोणी, आमरास, चणा डाळीची आमटी किंवा दुधाबरोबर खातात. काहीजण तिच्यावर साखर घालून खातात.
पुरणपोळी किती दिवस टिकते?
साधारणपणे २-३ दिवस टिकते. फ्रिजमध्ये ठेवल्यास ४-५ दिवस चालते.
पुरणपोळी खाण्याचे काय फायदे आहेत?
पुरणपोळीमध्ये प्रथिने, कार्बोहायड्रेट्स आणि ऊर्जा भरपूर असते. ती पौष्टिक असून पचायला चांगली आहे.
महाराष्ट्रात पुरणपोळीचा सण कोणता आहे?
नागपंचमी, गणेश-चतुर्थी, गुडी-पाडवा, होळी, अक्षय-तृतीया आणि पोळा यांसारख्या सणांमध्ये पुरणपोळी बनवली जाते.
पुरणपोळीची चव कशी असते?
पुरणपोळीची चव गोड आणि साधारणत: मऊ असते. तिच्यात पुरणाची गोडी आणि पोळीचा मऊपणा यांचा मेळ असतो.
पुरणपोळीला इंग्रजीत काय म्हणतात?
पुरणपोळीला इंग्रजीत “Sweet Stuffed Flatbread” किंवा “Puran Poli” असे म्हणतात.
पुरण पोळी गुजराती आहे की मराठी?
पुरणपोळी मराठी पक्वान्न आहे, परंतु गुजरातमध्ये तिला “वेदमी” किंवा “पुरण पोली” म्हणतात.

नमस्कार! मित्र आणि मैत्रिणींनो, मी सुशील जाधव, सोलापूरचा एक मराठी माणूस आणि महाराष्ट्रीय पाककृतीचा जबरदस्त छंदी. शिक्षणाने मी पुणे विद्यापीठातून बी.सी.ए. (BCA) पदवीधर आहे, पण मनाने मी एक अन्नप्रेमी आहे – महाराष्ट्राच्या रुचकर, नव्या-जुन्या पद्धतीच्या पाककृती शोधायचं, बनवायचं आणि इतरांना शिकवायचं माझा छंद आहे.