चिकन बिर्याणी रेसिपी ǀ Chicken Biryani Recipe in Marathi

चिकन बिर्याणी (Chicken Biryani Recipe) ही प्रत्येक घरातील अतिशय लोकप्रिय, रुचकर आणि नेहमी बनवली जाणारी रेसीपी आहे. भारतातील जवळपास प्रत्येक घरात ही रेसीपी आवडीने केली जाते. ही डिश चिकन, बासमती तांदूळ आणि काही मसाले एकत्रित वापरुन बनवली जाते. या लेखात आम्ही सोप्या पद्धतीने मराठीत चिकन बिर्याणीची रेसिपी सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्ही घरीच परिपूर्ण अशी बिर्याणी बनवू शकाल.

तर मग चला, चिकन बिर्याणी बनवायला!

चिकन बिर्याणी बनवण्यासाठी लागणारे साहित्य (Ingredients for Chicken Biryani Recipe)

मुख्य घटक:

  • बासमती तांदूळ – २ कप (४०० ग्रॅम)
  • चिकन – ५०० ग्रॅम (मोठे तुकडे)
  • दही – १/२ कप
  • टोमॅटो – २ (बारीक चिरलेले)
  • कांदा – २ (बारीक चिरलेले)
  • हिरवी मिरची – ३-४ (बारीक चिरलेल्या)
  • पुदीना आणि कोथिंबीर – १/२ कप (चिरलेले)

मसाले:

  • लवंग – ४-५
  • वेलची – ४-५
  • दालचिनी – २ तुकडे
  • तेजपत्ता – २
  • जिरे – १ टीस्पून
  • गरम मसाला – १ टीस्पून
  • हळद – १/२ टीस्पून
  • लाल मिरची पूड – १ टीस्पून
  • बिर्याणी मसाला – १ टेबलस्पून

इतर घटक:

  • तूप किंवा घी – ३-४ टेबलस्पून
  • तेल – २ टेबलस्पून
  • केशर – १ चिमूट (गरम दुधात भिजवलेला)
  • मीठ – चवीनुसार
chicken biryani recipe मराठीत

चिकन बिर्याणी बनवण्याची पद्धत (Step-by-Step Chicken Biryani Recipe)

स्टेप १: चिकन मरिनेट करणे

  1. चिकनचे तुकडे स्वच्छ धुऊन कोरडे करा.
  2. एका मोठ्या वाटीत दही, हळद, लाल मिरची पूड, गरम मसाला, बिर्याणी मसाला आणि मीठ घाला.
  3. या मिश्रणात चिकनचे तुकडे घालून चांगले मिक्स करा.
  4. कमीतकमी ३० मिनिटे किंवा जास्तीत जास्त २ तासासाठी फ्रिजमध्ये मेरीनेट करून ठेवा.

स्टेप २: तांदूळ शिजवणे

  1. बासमती तांदूळ स्वच्छ धुऊन ३० मिनिटे पाण्यात भिजत ठेवा.
  2. एका भांड्यात पाणी घ्या, त्यात थोडे तेल, लवंग, वेलची, दालचिनी आणि मीठ घाला.
  3. आता पाण्याला उकळी आल्यावर भिजवलेलं बासमती तांदूळ टाका.
  4. तांदूळ ७०% शिजवून घ्या (तांदूळ पूर्णपणे मऊ होऊ नयेत, नाहीतर बिर्याणी चिकट होईल).
  5. तांदूळ ७०% शिजल्यानंतर गाळून घ्या आणि बाजूला ठेवा.

स्टेप ३: चिकनची ग्रेव्ही तयार करणे

  1. एका कढईत तूप आणि तेल गरम करा.
  2. त्यात जिरे, तेजपत्ता, लवंग, वेलची आणि दालचिनी घालून सुगंध येईपर्यंत परता.
  3. आता बारीक चिरलेला कांदा घालून सोनेरी होईपर्यंत भाजा.
  4. त्यात टोमॅटो, हिरवी मिरची, पुदीना आणि कोथिंबीर घालून मिक्स करा.
  5. मरिनेट केलेला चिकन घालून ५-७ मिनिटे परता.
  6. थोडे पाणी (१/४ कप) घालून झाकण ठेवून चिकन पूर्ण शिजवा.
  7. चिकन शिजले असेल तर, आपली चिकनची ग्रेव्ही तयार झाली आहे.

स्टेप ४: लेयरिंग करून बिर्याणी डममध्ये शिजवणे

  1. एका पातेल्यात (किंवा डममध्ये) प्रथम चिकनची ग्रेव्ही ओतून टाका.
  2. त्यावर शिजवलेले तांदूळ समान रीतीने पसरवा.
  3. लक्षात असू दया की, थर कसं बनवायचा. पहिल्यांदा चिकन ची ग्रेव्ही, त्याच्यावर शिजवलेले तांदूळ, परत चिकन ची ग्रेव्ही आणि परत त्याच्यावर शिजवलेले तांदूळ, असे थर तुम्ही वाढवू शकता, जर तुम्ही ज्यास्त बिर्याणी बनवत असाल तर.
  4. त्याच्या नंतर थरावर कोथिंबीर, पुदीना, केशर मिश्रित दूध आणि थोडे तूप शिंपडा.
  5. झाकण घट्ट बंद करून १५-२० मिनिटे “डम” पद्धतीने शिजवा (कमी आचेवर).

स्टेप ५: सर्व्ह करणे

  1. १५-२० मिनिटानंतर बिर्याणी गरमागरम सर्व्ह करण्यासाठी तयार आहे, आता तुम्ही सर्व्ह करू शकता.
  2. बिर्याणी वरून कोथिंबीर आणि बारीक चिरलेले कांदे घालून गार्निश करा. गार्निश केल्यामुळे बिर्याणीचा सुगंध आणखी वाढेल.

चिकन बिर्याणी बनवताना काळजी घ्यावयाच्या गोष्टी (Tips for Perfect Chicken Biryani)

  • चिकन ताजे आणि मऊ असावे.
  • तांदूळ जास्त शिजवू नका, नाहीतर ते चिकट होतील.
  • मसाल्यांचे प्रमाण चवीनुसार घ्या.
  • डम पद्धतीने शिजवताना आच कमी ठेवा(मंद गॅस).

निष्कर्ष

चिकन बिर्याणी (Chicken Biryani Recipe) हा एक उत्तम आणि खूप चांगली पाककृती आहे जी  कधीही घरात बनवता येते. वरील सोप्या पद्धतीचा वापर करून तुम्हीही रेस्टॉरंटसारखी चिकन बिर्याणी घरी बनवू शकता. चविष्ट आणि अतिशय सुगंधित बिर्याणी बनवण्यासाठी ही रेसिपी नक्की वापरून पहा!

काय म्हणता! मग बनवाल ना चिकन बिर्याणी! नक्कीच प्रयत्न करा.

वरील चिकन बिर्याणी रेसिपी ही खूपच सोपी आहे. घरी तुम्ही नक्की बनवण्याचा प्रयत्न करा.  ही पद्धत शेअर करा आणि कमेंटमध्ये आम्हाला तुमचे प्रश्न आणि अनुभव सांगा!

नेहमी विचारले जाणारे प्रश्न

चिकन बिर्याणीमध्ये कोणता तांदूळ वापरावा?

बासमती तांदूळ वापरा कारण हा सुगंधित, खायला चवदार तसेच त्याचे दाणे इतर तांदळपेक्षा खूप लांब असतात.

चिकन बिर्याणी किती वेळ मरिनेट करावे?

किमान ३० मिनिटे ते २ तास मरिनेट करावे, जास्त वेळ असेल तर चव उत्तम येते.

बिर्याणीमध्ये दही का घालतात?

दहीमुळे चिकन मऊ होते आणि मसाल्यांची चव चांगली लागते.

डम पद्धत म्हणजे काय?

ही एक हळू शिजवण्याची पद्धत आहे ज्यामध्ये भांडे घट्ट बंद करून कमी आचेवर बिर्याणी शिजवली जाते.

चिकन बिर्याणीला काय साइड डिश बरोबर द्यावे?

बिर्याणीबरोबर चिकन ची करी(पातळ), मिरचीचा सलान किंवा कोशिंबीर दिले तर चव वाढते. तुम्ही सॅलड चा ही वापर करू शकता.

Leave a comment