पाव भाजी रेसिपी ǀ Pav Bhaji Recipe In Marathi

तुम्ही Pav Bhaji recipe मराठी शोधत असाल, तर ही मार्गदर्शक पाककृती तुमच्यासाठी आहे! पाव भाजी हा मुंबईतील सर्वात लोकप्रिय स्ट्रीट फूड किंवा स्नॅक्स आहे, जो कोणत्याही वेळी खाल्ला जाऊ शकतो. मऊ बन्स (पाव) आणि मसालेदार भाजीची जोडणी अशी की ती खाताच मन आनंदाने भरून जाते. घरगुती पद्धतीने पाव भाजी बनवणे खूप सोपे आहे, फक्त योग्य मसाले आणि तंत्र माहिती असले पाहिजे.

या लेखात, आम्ही तुम्हाला सोप्या आणि चवदार पाव भाजी रेसिपी च्या टिप्स आणि युक्त्या सांगणार आहोत.

पाव भाजी बनवण्यासाठी साहित्य (Ingredients for Pav Bhaji Recipe in Marathi)

भाजीसाठी:

  • २ मध्यम बटाटे (उकडलेले आणि चिरलेले)
  • १ वाटी फ्लॉवर (फुलकोबी) (बारीक चिरून)
  • १ गाजर (बारीक चिरून)
  • १ वाटी मटार (पिठी केलेली)
  • २ मध्यम टोमॅटो (बारीक चिरून)
  • १ मध्यम कांदा (बारीक चिरून)
  • २ हिरवी मिरची (बारीक चिरून)
  • १ टीस्पून लसूण-आलेचे पेस्ट
  • १ टीस्पून पाव भाजी मसाला
  • १/२ टीस्पून हळद पूड
  • १ टीस्पून लाल तिखट पूड
  • मीठ (चवीनुसार)
  • २ टेबलस्पून तूप किंवा बटर
  • कोथिंबीर (वरपासून सजावटीसाठी)

पावसाठी:

  • ८-१० लहान बन्स (पाव)
  • बटर (सर्व्हिंगसाठी)
पाव भाजी रेसिपी मराठीत

पाव भाजी बनवण्याची सोपी पद्धत (Step-by-Step Pav Bhaji Recipe in Marathi)

भाजी तयार करणे

  1. प्रेशर कुकरमध्ये बटाटे, फुलकोबी, गाजर आणि मटार घालून ३-४ शिट्ट्या देऊन उकडून घ्या.
  2. कढईत तूप गरम करा आणि त्यात कांदा घालून सोनेरी होईपर्यंत परता.
  3. आता लसूण-आलेचे पेस्ट आणि हिरवी मिरची घालून १ मिनिट परता.
  4. टोमॅटो घालून मऊ होईपर्यंत शिजवा.
  5. आता आपण जे काही उकडून ठेवलं होतं(बटाटा, फुलकोबी,गाजर आणि मटार)ते सर्व कढईत तळलेल्या मासाल्या मध्ये मिसळून घ्या आणि मसाला आणि उकडलेलं एकजीव होईपर्यंत परता.
  6. पाव भाजी मसाला, हळद, लाल तिखट, मीठ आणि पाणी घालून ५-७ मिनिटे ढवळत राहा.
  7. शेवटी भाजीला बटर घालून मिक्स करा.

आता आपली भाजी तयार आहे.

पाव तयार करणे

  1. गरम तव्यावर थोडे बटर पसरावा आणि पावला दोन्ही बाजूंनी क्रिस्पी होईपर्यंत भाजा.
  2. खाण्या एवडेच पाव बटर मध्ये भाजून घ्या, कारण थंड पावला म्हणावी तेव्हडी चव येत नाही.

सर्व्हिंग

  1. गरम गरम भाजीवर कोथिंबीर आणि बटर घाला.
  2. लिंबू चिरून बाजूला ठेवा आणि क्रिस्पी पावसोबत सर्व्ह करा.
  3. शक्यतो पाव गरम असतानाच सर्व्ह करा. कारण गरम पावाबरोबर पाव भाजी ची चव उत्तम लागते.

आता आपली पाव भाजी तयार आहे! भाजीवर पिळलेला लिंबू, बटर लाऊन गरम केलेला पाव आणि बारीक कापलेला गोड कांदा…. लय झकास कॉम्बिनेशन!

पाव भाजी परफेक्ट बनवण्याचे टिप्स

  • भाजी जास्त पातळ होऊ नये म्हणून ती जास्त वेळ शिजवा.
  • खरा चवदारपणा मिळवण्यासाठी पाव भाजी मसाला आवश्यक आहे. तुम्ही कोणताही पाव भाजी मसाला वापरू शकता.
  • शेवटी भाजीवर बटर घातल्याने चव वाढते.
  • जर भाजी खूप घट्ट असेल, तर थोडे पाणी किंवा टोमॅटो प्युरी घालून मिक्स करा.

निष्कर्ष: घरगुती पाव भाजीचा आनंद घ्या!

वरील पाव भाजी रेसिपी ही सोपी आणि चवदार पद्धत तुम्हाला नक्कीच आवडली असेल. ही रेसिपी तुमच्या कुटुंबासाठी एक परफेक्ट आणि पौष्टिक स्नॅक्स ठरेल. पाव भाजी अशी आहे, की तुम्ही सकाळ, संध्याकाळ आणि दुपारचा नाश्ता म्हणून घेऊ शकता. मग स्ट्रीट स्टाईल पाव भाजीचा आनंद आता घरीच घ्या!

तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल, तर तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आमच्या ब्लॉगवर इतर मराठी रेसिपीसाठी भेट द्या! तुमच्या सूचना आम्हाला नक्की कळवा.

नेहमी विचारले जाणारे प्रश्न

पाव भाजी बनवताना कोणते मसाले वापरावे?

पाव भाजी मसाला, लाल तिखट, हळद, आले-लसूण पेस्ट आणि बटर हे मुख्य मसाले वापरावेत.

पाव भाजी जास्त पातळ झाल्यावर काय करावे?

भाजी जास्त शिजवून पाणी आटवा किंवा बटाट्याचं प्युरी घालून गाढ़ करावं.

पाव भाजीला काय काय भाज्या घालतात?

बटाटे, फुलकोबी, गाजर, मटार, टोमॅटो आणि कांदा ह्या मुख्य भाज्या वापरतात.

पाव भाजी चटपटीत कशी बनवायची?

जास्त बटर, पाव भाजी मसाला आणि हिरव्या मिरचीचा वापर करून चटपटीत चव मिळवता येते.

पाव भाजी सर्व्ह करताना काय सोबत द्यावं?

कोथिंबीर, लिंबू, चिरलेला कांदा आणि अतिरिक्त बटर सोबत द्यावं.

Leave a comment